स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : जबरी चोरीतील मोबाईल हस्तगत; दोन आरोपी जेरबंद

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे मोटारसायकलवरून जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. फिर्यादीकडे पैसे नसल्याने आरोपींनी त्यांच्याकडील ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मुकेश अटवाळ याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला. तपासात आरोपी अक्षय मुकेश अटवाळ याच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी व चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ. दीपक शिरसाठ करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड,...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक...

नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक...

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड...

रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री...

रावेर (प्रतिनिधी):   रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला...

संपादक - रजत शेख

Latest