झाडाला दिला मोकळा श्वास

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम राबवत विद्यालय परिसरातील वडाच्या झाडाभोवती अनेक वर्षांपासून करण्यात आलेले काँक्रिटीकरण हटविण्यात आले. यामुळे झाडाच्या मुळांपर्यंत हवा, पाणी व पोषकद्रव्ये सहज पोहोचून त्याची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होणार आहे.

 

उपक्रमांतर्गत झाडाभोवतीचे काँक्रिट काळजीपूर्वक फोडून माती खुली करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जाणून घेतले.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी सांगितले की, “झाडे ही पृथ्वीचा श्वास आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना मोकळा श्वास घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षणाची सुरुवात आपल्या परिसरातील प्रत्येक झाडापासून व्हायला हवी.”

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, विद्यालयाच्या या पुढाकाराचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

संस्थापकांच्या विचारांचा जागर; ‘स्व. सुरेश मामा नाईक सभागृह’ नामकरणाने...

मेहरुण (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व. सुरेश मामा नाईक यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

जळगाव:झिरो फेटॅलिटी मोहिमेत वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई; ३७५ वाहनचालकांवर...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):दि. १५ जुलै : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली आज "झिरो फेटॅलिटी" व अपघात प्रतिबंधक विशेष...

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी – एक कौशल्य’...

जळगाव(प्रतिनिधी): रामेश्वर कॉलनी येथील रोजी मेहरून जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे "एक विद्यार्थी – एक कौशल्य"...

संपादक - रजत शेख

Latest