अधिक महिन्यात शिक्षणाची शुभ सुरुवात; मातांना आंब्याच्या बीजाची पर्यावरणपूरक ओटी

Spread the love

जळगाव, प्रतिनिधी : सरिता महाजन

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी तसेच अधिक महिन्याचे औचित्य साधत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “आईचा सन्मान – संस्कारांचा अभिमान” हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचा सन्मान करत पारंपरिक पद्धतीने ओटी भरली. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येक मातेला ओटीमध्ये आंब्याचे बीज भेट देण्यात आले. या बीजांपासून रोपे तयार करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केला.

आई ही मुलांची पहिली गुरु असून तिच्या संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मातृसन्मानासोबतच वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित पालकांच्या विशेष पसंतीस उतरला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृसन्मान, संस्कार आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest