वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

Spread the love

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ५ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १ लाख ८७ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुमारे ४ लाख रुपये किमतीची बलेनो कारचा समावेश आहे.

 

दि. २२ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाढवणा परिसरात गस्त घालत असताना हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावरून बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह सापळा रचला. एमएच-०५-डीएच-५२६६ क्रमांकाची संशयित बलेनो कार येताच ती थांबवून चालकाची झडती घेण्यात आली.

 

कारच्या मागील सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखू आढळून आला. या प्रतिबंधित पदार्थांची किंमत १ लाख ८७ हजार २०० रुपये असल्याचे समोर आले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ४ लाख रुपये किमतीची बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली.

 

या प्रकरणी मुबीन सिद्दिख सय्यद (वय २९, रा. दर्गापूर, अहमदपूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात कलम १२३, २७४, २७५, २२३ बी.एन.एस. अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, आनंद हल्लाळे आणि प्रविण कोळसुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest