सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात कारवाई; ७.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

सिंदखेड : (प्रतिनिधी):

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सिंदखेड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत १ लाख ४० हजार ७०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू तसेच सुमारे ६ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना मौजे सारखणी वनोउपज तपासणी नाका परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित कार (एमएच-२९ सीआर-०१५५) अडवून तपासणी केली.

 

तपासणीदरम्यान वाहनातील पोत्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

या प्रकरणी प्रफुल भालचंद्र येन्नावार (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, पुसद) आणि निवृत्ती धर्माजी अल्लडवार (वय ४९, रा. सुभाष वॉर्ड, पुसद, जि. यवतमाळ) यांच्याविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध बीएनएसच्या कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत, कदम, वानखेडे तसेच सिंदखेड पोलीस ठाण्यातील होमगार्ड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest