जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त, संशयित आरोपी ताब्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या दोन बजाज पल्सर आणि एका होंडा युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

 

दिनांक १३ ऑगस्ट रोजी बालाजी पेठ येथून बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. फिर्यादी निलेश प्रकाश बोरसे (वय २७, रा. बालाजी पेठ, जळगाव) हे बाहेरगावी गेले होते. ते १८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी DB पथकाला मोटारसायकल व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच परि.पो.उनि. संतोष खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयिताची माहिती मिळवली. त्यानंतर संशयित शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) याला एरंडोल बसस्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. पुढील तपासात त्याच्याकडून दोन बजाज पल्सर व एक होंडा युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

 

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, परि.पो.उनि. संतोष खेडकर, परि.पो.उनि. अभिषेक कटारे, पोहेकॉ. विजय खैरे, पोहेकॉ. योगेश जाधव, पो.कॉ. पराग दुसाने, पो.कॉ. अमोल वंजारी, पो.कॉ. निलेश घुगे, पो.कॉ. गणेश ढाकणे, पो.कॉ. योगेश साबळे तसेच CCTV फुटेज विश्लेषक पो.कॉ. मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात कारवाई; ७.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदखेड : (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सिंदखेड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत...

संपादक - रजत शेख

Latest