‘एक पाऊल पर्यावरणासाठी’; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण समितीची स्थापना

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी):मेहरूण, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी श्री. मुकेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून समिती प्रमुख म्हणून सौ. रूपाली आव्हाड मॅडम यांची निवड करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे मार्गदर्शक म्हणून कार्य पाहणार आहेत.

या समितीमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता तिसरीची तृप्ती रोहित पाटील, इयत्ता चौथीची प्रांजल योगेश राठोड, इयत्ता पाचवीची स्वरा सुशील चव्हाण, इयत्ता सहावीची मानसी सतीश बोरसे, इयत्ता सातवीचा कन्हैया संदीप पाटील, इयत्ता आठवीची चैताली शरद इंदलकर, इयत्ता नववीची रोहिणी छगन पाटील तसेच इयत्ता दहावीची दुर्गा आधार पाटील यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

समितीमार्फत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी बचत व जलसंधारण, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम तसेच ऊर्जा बचत यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी करण्याचा समितीचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढून सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

🌱 “एक पाऊल पर्यावरणासाठी, हरित भविष्यासाठी” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest