स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान २०२६-२७’चे आयोजन

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी ‘स्मृती प्रवेश अभियान २०२६-२७’ राबविण्यात येणार आहे.

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या शिक्षणप्रेमी विचारांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत जनजागृती करणे, पालकांशी संपर्क साधणे, घरभेटी घेणे तसेच नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

जयंतीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे विशेष सवलती व प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.

“प्रत्येक बालक शाळेत – प्रत्येक बालक शिक्षित” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणे आणि शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमात पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी केले आहे. तसेच इयत्ता पहिलीसाठी सुरू असलेल्या विशेष सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ७० लाखांचे एमडी...

ठाणे(प्रतिनिधी) : ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ७० लाख रुपये किमतीचे ५००.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर आणि...

राहुरीतील फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद; गावठी कट्ट्यासह २...

राहुरी (प्रतिनिधी): राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे घडलेल्या फायरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या काही तासांत मुळा धरण परिसरातून अटक केली....

गेवराई पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर...

गेवराई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली...

संपादक - रजत शेख

Latest