जळगावात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; इच्छादेवी, आकाशवाणी चौकासह महामार्गावर नाकाबंदी

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी: इमरान खान):

जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक शाखेने बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक तसेच महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

 

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिरले, पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्यासह शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

नाकाबंदी मोहिमेदरम्यान हेल्मेट न वापरणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाईत सफौ. विजय इंगळे, सफौ. कादीर शेख, पोह. दिलीप पाटील, पोह. सुनील तडर्वा, सफौ. दीपक बनसोडे, पोह. विकास पाटील आणि मपोह. ललिता कोळी यांनी सहभाग घेतला. तसेच इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातूनही नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस विभागाच्या माहितीनुसार, मोहिमेत एकूण ३३७ प्रकरणांमध्ये २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये हेल्मेटसह विविध वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांचा समावेश आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध आणि अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धही स्वतंत्र कारवाई करण्यात आली.

शहरातील वाहतूक शिस्त कायम राहावी आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest