प्लास्टिक कव्हरला नकार; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कागदी कव्हर बंधनकारक

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन) : जळगाव शहर महानगरपालिका आणि यूथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “जळगाव क्लायमेट वॉरियर्स” अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना प्लास्टिकऐवजी कागदी कव्हर लावण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक डबे, प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक कव्हरचा वापर टाळण्याचे आवाहन केले. त्याऐवजी स्टीलचे डबे, स्टीलच्या बाटल्या तसेच जुन्या वर्तमानपत्रांपासून तयार केलेले कागदी कव्हर वापरण्याचा संदेश त्यांनी दिला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना कागदी कव्हर लावणे बंधनकारक करण्यात आले असून प्लास्टिक कव्हर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यालयाच्या पर्यावरण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जुन्या वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून पुस्तकांना कव्हर लावण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

प्लास्टिकमुक्त शाळा अभियानांतर्गत यापुढेही विविध जनजागृतीपर आणि कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest