धाराशिवमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत

Spread the love

धाराशिव(प्रतिनिधी ): जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका आरोपीला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगताना रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईमुळे अवैध शस्त्रधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक अवैध शस्त्रधारकांवर लक्ष ठेवून होते. त्याचदरम्यान १२ जून रोजी येरमाळा चौक परिसरात एका व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने आंदोरा येथील हॉटेल निसर्गसमोर सापळा रचला. संशयित शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. भूम) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेला लोखंडी गावठी कट्टा आणि पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील हे आणखी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. संशयास्पद हालचाली किंवा अवैध शस्त्रांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest