रावेरमध्ये हॉटेलमध्ये तरुणावर लोखंडी पाइप-दांडक्यांनी हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Spread the love

रावेर (प्रतिनिधी) : शहरातील एका हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका तरुणाला लाकडी दांडके व लोखंडी पाइपने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना १३ जून रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमित मनोज भावसार (वय ३२, रा. इतवारा, बुरहानपूर) हे १३ जून रोजी रात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास रावेर येथील राज हॉटेलमध्ये असताना त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. वाद वाढल्यानंतर आकाश महाजन, ईश्वर महाजन, सागर (मॅनेजर), सचिन महाजन आणि राज महाजन (हॉटेल मालक) यांनी संगनमत करून सुमित भावसार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी लाकडी दांडके व लोखंडी पाइपचा वापर करत भावसार यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, पाठीवर तसेच हात-पायांवर गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर जखमी भावसार यांनी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित पाच आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे. रावेर शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest