प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी साकारल्या मातीच्या कलाकृती

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन) :श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनविण्याचा सर्जनशील उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मातीपासून गणपतीसह विविध प्राणी-पक्ष्यांच्या आकर्षक मूर्ती साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला.

विद्यार्थ्यांनी मातीला विविध आकार देत गणपती, हत्ती, सिंह, कासव, ससा, पक्षी आदींच्या मूर्ती तयार केल्या. प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना मातीसोबत काम करण्याचा आनंद मिळाला. तसेच या उपक्रमामुळे त्यांची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि हस्तकौशल्य विकसित होण्यास मदत झाली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मातीच्या गणेशमूर्तींतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्तींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

 

या उपक्रमासाठी पर्यवेक्षक निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपशिक्षिका अनिता सोनवणे, करिष्मा चव्हाण व परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.

 

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कलाकृती साकारल्या. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अभ्यासासोबतच अशा कृतीशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि विविध कौशल्यांना चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

नर्मदेश्वर महादेव मंदिरात भंडारा; कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी...

जळगाव(संपादक: रजत शेख) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा बाजार समितीतील व्यापारी, हमाल,...

जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात;९ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त...

जळगाव : (प्रतिनिधी:इमरान खान): जळगाव-ममुराबाद मार्गावरील म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत कावड यात्रेत सहभागी झालेल्या ९ वर्षीय प्रबळ राजू...

जिल्हापेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानकातील चोरीचा छडा, दोन सराईत...

जळगाव : (प्रतिनिधी) :जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

संपादक - रजत शेख

Latest