जिल्हापेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानकातील चोरीचा छडा, दोन सराईत महिला ताब्यात

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी) :जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उषा चंदन ससाणे (वय ४८, रा. नारायणवाडी, इंदिरानगर, ता. चाळीसगाव, ह.मु. हरिविठ्ठल नगर, जळगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. राजीव गांधी नगर, वाघ नगर, जळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

 

दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नवीन बसस्थानक, जळगाव येथे जळगाव ते चाळीसगाव जाणाऱ्या बसमध्ये फिर्यादी चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच कानातील सोन्याचे टॉगल असा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दिनांक २० जुलै २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २२६/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अनिल वाघ यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्यासह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार केले.

 

तपासादरम्यान पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली. तसेच गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वरील दोन्ही महिला आरोपींना ताब्यात घेतले.

 

चौकशीत दोन्ही महिला आरोपी देराणी-जेठाणी असल्याचे समोर आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. क्र. २२६/२०२६, १७३/२०२६ आणि २१२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

१ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

पोलिसांनी पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींकडून खालील सोन्याचे दागिने जप्त केले—

 

– ४५ हजार रुपये किमतीची अंदाजे ८ ते ९ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत व अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉगल.

– १५ हजार रुपये किमतीची अंदाजे ४ ते ५ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत.

– ४५ हजार रुपये किमतीची अंदाजे ७ ते ८ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत.

 

अशाप्रकारे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता अमळनेर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २३६/२०२६, भा.दं.वि. कलम ३७९ तसेच जळगाव शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ८०/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.

 

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक/१०७८ संतोष सोनवणे, जिल्हापेठ पोलीस ठाणे करीत आहेत.

 

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदिप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री. अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

कारवाईत पोहवा गणेश शिरसाळे, पोहवा नरेश सोनवणे, पोहवा महेंद्र पाटील, पोहवा किरण वानखेडे, तेजस मराठे, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा ढमढेरे, तसेच नेत्रम शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख व पोलीस नाईक रुस्तम तडवी यांनी सहभाग घेतला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद चोरीच्या तीन...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. २२ ऑगस्ट २०२६ : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे....

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

संपादक - रजत शेख

Latest