‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

Spread the love

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक देऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी करिश्मा चव्हाण-परदेशी यांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले. साबणाने हात धुताना तळहात, हाताची पाठ, बोटांमधील भाग, अंगठे, नखे आणि मनगट स्वच्छ करण्याची योग्य पद्धत त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दाखवून दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत हात धुण्याची पद्धत कृतीतून आत्मसात केली.

 

उपक्रमासाठी पर्यवेक्षक निलेश पवार व उपशिक्षिका अनिता सोनवणे उपस्थित होते. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव करणे आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश होता. 


Spread the love

या बातम्या देखील वाचा

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; अट्टल मोटारसायकल चोरटा जेरबंद चोरीच्या तीन...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. २२ ऑगस्ट २०२६ : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे....

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest