नाडगावातील देशी दारू दुकान फोडले; ३९ हजारांचा मद्यसाठा लंपास

Spread the love

बोदवड(प्रतिनिधी ):तालुक्यातील नाडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानाचे शटर वाकवून सुमारे ३९ हजार रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनोटी रोडवरील ‘प्यासा देशी बार’ या दुकानात १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपासून ते २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि देशी दारू व बिअरच्या पेट्यांवर हात साफ केला.

 

दुकानाचे मालक सागर धनराज जैस्वाल (वय ४८, रा. बोदवड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालात बॉबी संत्रा व टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या पेट्या, ९० एमएलच्या बाटल्यांचा साठा तसेच कॅनॉन कंपनीच्या बिअरच्या पेट्यांचा समावेश आहे. या सर्व मालाची किंमत ३९ हजार १७८ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस निरीक्षक आशीष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव यांच्या देखरेखीखाली पोहेकॉ संतोष चौधरी पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड; तीन आरोपी जेरबंद,...

नांदेड(प्रतिनिधी )विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत विमानतळ गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून...

जळगावात ३ दिवस वाहतुकीत मोठा बदल; रेल्वे ब्रिज दुरुस्तीमुळे...

जळगाव(प्रतिनिधी ): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरता बदल केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन...

शाळा व्यवस्थापन समितीचा अभिनव उपक्रम; फ्रेंडशिप डे निमित्त नशामुक्तीचा...

मेहरुण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये खरी मैत्री, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्त समाजाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे...

संपादक - रजत शेख

Latest