24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड; तीन आरोपी जेरबंद, दोन मोबाईल हस्तगत

Spread the love

नांदेड(प्रतिनिधी )विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत विमानतळ गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी रात्री फिर्यादी हे मोटारसायकलवरून घरी जात असताना एलआयसी कार्यालयाच्या पाठीमागे, महाराणा प्रताप चौक परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी दगडाने मारहाण करून त्यांच्या जवळील सॅमसंग S24 मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. त्याच वेळी परिसरातील आणखी एका नागरिकाचा रेडमी कंपनीचा मोबाईलही जबरदस्तीने लुटण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 351/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रामदास शेंडगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. अल्पावधीतच आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रतीक हरीष सोनटक्के (वय 22), राहुल अशोकराव थोरात (वय 23) आणि प्रशिक देवानंद श्रावणे (वय 19), सर्व रा. राजीव गांधी शाळेमागे, बालाजी नगर, नांदेड यांचा समावेश आहे.

 

आरोपींकडून गुन्ह्यातील एक सॅमसंग गॅलेक्सी S24 मोबाईल (अंदाजे किंमत 8 हजार रुपये) आणि एक रेडमी कंपनीचा टचस्क्रीन मोबाईल (अंदाजे किंमत 6 हजार रुपये) असा एकूण 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून यापूर्वी अशा प्रकारचे आणखी गुन्हे झाले आहेत का, याचा तपास सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड करीत आहेत.

 

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार चिंतोरे, जावेद शेख, जयपासिंघ ठाकुर, शोएब शेख आणि प्रवीण ससाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 

दरम्यान, कोणतीही जबरी चोरी, लूटमार अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest