रामानंद नगर पोलिसांची घरफोडी उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी):

रामानंद नगर पोलिसांनी पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

७ जुलै २०२६ रोजी रात्री पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स व रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी सुरेश नरवाडे यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) व दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघेही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला फिर्यादीच्या तक्रारीप्रमाणे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि पोशी सागर नन्नवरे यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

आषाढी एकादशीनिमित्त माजी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण; “शाळा हेच आमचे पंढरपूर”...

मेहरुण (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला....

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘टिळक जिगसॉ मिशन’ उपक्रम उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी "टिळक...

चालक सीटवर प्रवासी बसवणाऱ्या ३९ ऑटोरिक्षांवर कारवाई; सव्वा लाखांहून...

लातूर ( प्रतिनिधी):   लातूर शहरात चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त विशेष मोहीम...

संपादक - रजत शेख

Latest