चिकूच्या आमिषाने बागेत नेले; १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकू खाण्याचे आमिष दाखवून मुलीला चिकूच्या बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४३ वर्षीय आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता पीडित मुलगी घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपी सुनील अर्जुनराव सावके (वय ४३) याने तिला चिकू खाण्याचे आमिष दाखवत जवळील चिकूच्या बागेत नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

 

या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने २१ जुलै रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्याद मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

घटनेची गंभीर दखल घेत भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तपासात कायदेशीर प्रक्रियेनुसार ‘ई-साक्ष’ (डिजिटल पुरावा संकलन) प्रणालीचाही वापर करण्यात आला.

 

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६४, ६५ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील कलम ४, ६, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest