जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न फसला, आरोपी काही तासांत जेरबंद

Spread the love

रावेर ( प्रतिनिधी: सरिता महाजन) :

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून करून तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावेर पोलिसांनी अत्यंत वेगवान व वैज्ञानिक तपास करत अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत आढळून आली. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५८/२०२६ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

तपासादरम्यान घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यातून मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याच्यावर संशय बळावला.

 

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या कारणावरून काका-पुतण्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्याच रागातून २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर मार लागल्याने रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.

 

गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, रावेर पोलिसांनी बारकाईने व वैज्ञानिक पद्धतीने तपास करत हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला.

 

पोलिसांनी २२ जुलै २०२६ रोजी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक केली असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड,...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक...

नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक...

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड...

रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री...

रावेर (प्रतिनिधी):   रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला...

संपादक - रजत शेख

Latest