रामानंद नगर पोलिसांची घरफोडी उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी):

रामानंद नगर पोलिसांनी पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

७ जुलै २०२६ रोजी रात्री पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स व रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी सुरेश नरवाडे यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) व दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघेही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला फिर्यादीच्या तक्रारीप्रमाणे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी आणि पोशी सागर नन्नवरे यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest