चालक सीटवर प्रवासी बसवणाऱ्या ३९ ऑटोरिक्षांवर कारवाई; सव्वा लाखांहून अधिक दंड वसूल

Spread the love

लातूर ( प्रतिनिधी):

 

लातूर शहरात चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त विशेष मोहीम राबवत ३९ ऑटोरिक्षांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. २२) शिवाजी चौक परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने व लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

 

ऑटोरिक्षांच्या आसन व्यवस्थेत अनधिकृत बदल करून चालकाच्या शेजारी प्रवासी बसवणे, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करून नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

 

मोहिमेत मोटर वाहन निरीक्षक प्रकाश मुळे, अमोल कोकरे तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिपाली जाधव, राहुल देवगुंड आणि प्रवीण दरेकर यांच्या पथकाने वाहनांची तपासणी केली. वाहनांच्या रचनेत अनधिकृत फेरफार करून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३९ ऑटोरिक्षांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

 

कारवाईदरम्यान उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे आणि लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. भविष्यात नियमबाह्य व जीवितास धोका निर्माण करणारी प्रवासी वाहतूक आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सर्व चालकांनी मोटार वाहन कायदा व रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest