श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘टिळक जिगसॉ मिशन’ उपक्रम उत्साहात

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “टिळक जिगसॉ मिशन” हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका शितल कोळी उपस्थित होत्या.

यानंतर विद्यार्थ्यांना गटांमध्ये विभागून लोकमान्य टिळकांचे छायाचित्र जिगसॉ स्वरूपात जोडण्याचे आव्हान देण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साह, संघभावना आणि विचारकौशल्याचा उत्कृष्ट वापर करत अल्पावधीत जिगसॉ पूर्ण केला. त्यानंतर प्रत्येक गटाने लोकमान्य टिळकांचे जीवनकार्य, स्वातंत्र्य चळवळीतले योगदान आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड, निरीक्षणशक्ती, नेतृत्वगुण, संघभावना आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकमान्य टिळकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

उपक्रमासाठी पर्यवेक्षिका शितल कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी उपक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

चालक सीटवर प्रवासी बसवणाऱ्या ३९ ऑटोरिक्षांवर कारवाई; सव्वा लाखांहून...

लातूर ( प्रतिनिधी):   लातूर शहरात चालकाच्या शेजारी प्रवासी बसवून तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त विशेष मोहीम...

चिकूच्या आमिषाने बागेत नेले; १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकू खाण्याचे आमिष दाखवून मुलीला चिकूच्या...

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या...

संपादक - रजत शेख

Latest