धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):

धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मे २०२६ रोजी देवपूर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्र. १९५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने व १९ भार चांदीचे दागिने लंपास केले होते.

 

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे व सुशील चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील राजीव गांधी नगर येथील राहुल सतीश लोंढे (वय २०) व ओम भरत लोंढे (वय १८) यांनी ही घरफोडी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

 

ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रामानंद नगर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

 

सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी व अतुल चौधरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest