स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार व मोबाईल जप्त, दोघे ताब्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, एक कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत होते.

 

१७ जुलै रोजी मारुती सुझुकी अर्टिगा (एमएच-३० एझेड-४६६४) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

 

यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ८ लाख रुपयांची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि २० हजार रुपये किमतीचे व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी सय्यद आरिफ सय्यद हकीम (नदीम, वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि खलील उल्ला खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

 

यापुढेही जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यां वनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा...

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक...

झीरो फेटालिटी मोहिमेत शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; 143...

जळगाव(प्रतिनिधी): शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवार (18 जुलै 2026) रोजी राबविण्यात आलेल्या 'झीरो फेटालिटी' विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली....

संपादक - रजत शेख

Latest