एकाच रात्री पाच वाहनांच्या बॅटऱ्या चोरी; आरोपी काही तासांत रामानंद नगर पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान) शहरातील पिंप्राळा-हुडको परिसरात एकाच रात्री पाच वाहनांमधून बॅटऱ्या चोरी करणाऱ्या आरोपीला रामानंद नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या पाचही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जुबेर शेख जाबीर (रा. पिंप्राळा, हुडको, जळगाव) असे आहे.

 

१४ जुलै रोजी फिरोज खान युसूफ खान यांच्या रिक्षेतील बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात चौकशी केली असता समशेख खान कमर खान, वाहन अली शेख उस्मान, शेख सलीम शेख अमीर आणि मोईन शकील मलक यांच्या वाहनांतील बॅटऱ्याही त्याच रात्री चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यानंतर फिरोज खान यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तसेच पोलीस कर्मचारी सुधाकर आंभोरे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, योगेश बारी आणि मनोज मराठे यांच्या विशेष पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

 

पथकाने सापळा रचून जुबेर शेख याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या पाचही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या मालिकेचा छडा लागला असून पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest