अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन; विद्यार्थ्यांनी जोपासली वाचन संस्कृती

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, साहित्यप्रेम वाढविणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्यसंपदा आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून देत समता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

 

यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या ‘फकीरा’ कादंबरीतील निवडक उताऱ्यांचे सलग वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनानंतर त्या उताऱ्याचा आशय स्वतःच्या शब्दांत मांडल्याने वाचन कौशल्यासोबतच आकलनशक्ती, अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि संवादकौशल्याचा विकास झाला.

 

यावेळी फकीरा, वारणेचा वाघ, पाझर, वैजयंता आणि माझी मुंबई यांसह अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या साहित्यामधून सामाजिक परिवर्तन, मानवी मूल्ये, संघर्षशील जीवन आणि समतेचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) विद्यार्थ्यांमध्ये वाचन, आकलन आणि विचारशक्ती विकसित करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजून भाषिक कौशल्य आणि सामाजिक मूल्यांची जाणीव विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमास पर्यवेक्षिका शितल कोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी “दररोज वाचू, नवे शिकू आणि सुजाण नागरिक घडू” अशी सामूहिक वाचन प्रतिज्ञा घेतली.

 

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणारा, साहित्याविषयी आत्मीयता निर्माण करणारा आणि सामाजिक जाणीवा समृद्ध करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest