घरफोडी करणारा अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात; चोरीचे ८ हजार रुपये रोख हस्तगत

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील देशी दारू दुकानात घरफोडी करून रोख रक्कम चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक करत चोरीतील ८ हजार रुपये रोख मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनी येथील देशी दारू दुकानात १३ जुलैच्या रात्री ते १४ जुलैच्या सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर काउंटरमधील ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेली ८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी दुकान व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली. पथकाने घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताची ओळख पटवली.

त्यानुसार १४ जुलै रोजी सुप्रीम कॉलनी परिसरात सापळा रचून उमेश उर्फ भावड्या संतोष पाटील (वय २६, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील ८ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest