जळगाव : विनापरवाना गावठी कट्ट्यासह फिरणारा तरुण एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): शहरातील अयोध्यानगर परिसरात विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली १५ जुलै २०२६ रोजी अयोध्यानगर परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अयोध्यानगर ते गौरव हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सापळा रचला.

यावेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयिताला थांबवून झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत त्याने आपले नाव अभिषेक संजय हवलदार (वय २३), रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव (मूळ रा. बुधवार पेठ, सोलापूर) असे सांगितले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीकडून २० हजार रुपयांचा गावठी कट्टा, २ हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे आणि १ लाख रुपयांची बजाज चेतक इलेक्ट्रिक मोपेड असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व गुन्हे शोध पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; 24 तासांत चोरीचा गुन्हा उघड,...

जळगाव(प्रतिनिधी ):दि. 8 : शनिपेठ पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 24 तासांत वेल्डिंग मशीन व ग्राइंडर मशीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपीला अटक...

नागपुरात 1 किलो 145 ग्रॅम गांजासह युवक ताब्यात; एक...

नागपूर(प्रतिनिधी ):दि. 5 ऑगस्ट : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितार ओळी, नागोबा गल्ली क्रमांक 2 येथे धाड...

रावेर गुन्हे शोध पथकाची आभोडा येथे धाड; गोमांस विक्री...

रावेर (प्रतिनिधी):   रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा गावात अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला...

संपादक - रजत शेख

Latest