सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १ लाखांच्या चोरीचा काही तासांत उलगडा; आरोपी अटकेत

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):दि. १७ जुलै : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या १ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी काही तासांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीची संपूर्ण १ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४.१० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अबरार अली इरफान अली चौधरी (वय २६, रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) हे कालिका माता मंदिर चौकातील HDFC बँकेजवळ आले होते. त्यांनी त्यांची मोटारसायकल पार्क करून पाणीपुरी खात असताना वाहनाच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.

 

याप्रकरणी १६ जुलै रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५१/२०२६ भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू करण्यात आला.

 

तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे रवि जगदीश प्रजापत (वय ३६, रा. प्रजापत नगर, मामुराबाद रोड, जळगाव) याला असोदा रोडवरील निसर्ग कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली.

 

पोलिसांनी आरोपीकडून चोरीची संपूर्ण १ लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटर जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण पोहेका मुबारक देशमुख यांनी प्रभावीपणे केले.

 

दरम्यान, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू वाहनाच्या डिक्कीत अथवा वाहनात निष्काळजीपणे ठेवू नयेत. संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

बोदवड हद्दीत पोलिसांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन ६० रेकॉर्डवरील आरोपींची...

बोदवड(प्रतिनिधी):दि. ४ सप्टेंबर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोदवड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शुक्रवारी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन...

चोरीची मोटारसायकल विक्रीचा डाव उधळला; दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात,...

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन): चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनाक्रमांकाची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, ती...

क्षेत्रभेटीतून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख बेलेश्वर महादेव मंदिर...

मेहरूण(प्रतिनिधी: सरिता महाजन): विद्यार्थ्यांना भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण व्हावा, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानाची सांगड घालता...

संपादक - रजत शेख

Latest