झीरो फेटालिटी मोहिमेत शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; 143 वाहनचालकांवर कारवाई, ₹1.20 लाखांचा दंड

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवार (18 जुलै 2026) रोजी राबविण्यात आलेल्या ‘झीरो फेटालिटी’ विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ₹1 लाख 20 हजार 700 रुपयांचे ई-चलन करण्यात आले असून, ₹1,200 रुपयांचा रोख दंड जागीच वसूल करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 50 वाहनांवर, विना परवाना वाहन चालविणाऱ्या 39 जणांवर, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या 2 जणांवर, 4 नाबालिग चालकांवर, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या 10 वाहनचालकांवर, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 2 चालकांवर, विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या 13 चालकांवर तसेच इतर 23 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

रहदारीस अडथळा निर्माण करणारी वाहने आणि ट्रिपल सीट प्रवासाविरोधात दाणा बाजार परिसरात सायंकाळी 5 ते 6 या वेळेत विशेष मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीपी प्लाटून आणि शहर वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी संयुक्तपणे केली.

 

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातमुक्त शहर घडविण्याच्या उद्देशाने अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest