श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा समितीची स्थापना; अध्यक्षपदी शितल कोळी

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : महिलांना कार्यस्थळी सुरक्षित, सन्मानपूर्ण व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विशाखा समितीची स्थापना करण्यात आली.

 

समितीच्या अध्यक्षपदी सौ. शितल कोळी यांची, तर सचिवपदी सौ. उज्वला नन्नवरे यांची निवड करण्यात आली. तसेच समितीवर इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, बाह्य सदस्या म्हणून मेहरुण परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला प्रश्नांवर सातत्याने कार्य करणाऱ्या श्रीमती शोभाताई किसन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.

 

संस्थेचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या उपस्थितीत समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, उपशिक्षिका सुवर्णा आंभोरे, सरला पाटील, रूपाली आव्हाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

बाह्य सदस्या श्रीमती शोभाताई किसन चौधरी यांच्या सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा समितीच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

विशाखा समितीच्या माध्यमातून कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध, तक्रारींचे त्वरित निवारण, जनजागृती तसेच सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे...

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १०...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा,...

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,...

झीरो फेटालिटी मोहिमेत शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; 143...

जळगाव(प्रतिनिधी): शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवार (18 जुलै 2026) रोजी राबविण्यात आलेल्या 'झीरो फेटालिटी' विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली....

संपादक - रजत शेख

Latest