धुळे : मंदिरात चोरी करून पळणारा आरोपी पाठलाग करून रंगेहात जेरबंद; १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

धुळे (प्रतिनिधी): शहरातील दसेरा मैदान परिसरातील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या एका १९ वर्षीय आरोपीला धुळे शहर पोलिसांनी रात्रगस्ती दरम्यान पाठलाग करून रंगेहात अटक केली. आरोपीकडून १५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवार (१६ जुलै) रोजी पहाटे सुमारे ३.०५ वाजता डायल ११२ वरून पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी झाल्याची माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक आणि बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. मंदिरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

 

यावेळी मोटारसायकलस्वार सचिन वाडीले यांनी एका तरुणाला दसेरा मैदानाकडून सहजीवन नगरकडे जाणाऱ्या भुयारी रेल्वे बोगद्याच्या रस्त्याने खांद्यावर पेटीसारखी वस्तू घेऊन पळताना पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोध घेत असताना एक तरुण खांद्यावर दोन पेट्या घेऊन पळताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर शहा रमजान शहा (वय १९, रा. शंभर फुटी रोड, इब्राहिम मशिदीजवळ, धुळे) असे आहे.

 

आरोपीकडून कुलूपबंद दानपेटी, चांदीचा मुकूट आणि दोन चांदीचे तोडे असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सचिन वाडीले यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला रंगेहात पकडण्यात पोलिसांना मोलाची मदत झाली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चौधरी तसेच डी.बी. पथक व रात्रगस्त पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन; विद्यार्थ्यांनी जोपासली वाचन...

मेहरुण (प्रतिनिधी): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून 'फकीरा' वाचन मॅरेथॉन...

झिरो फेटॅलिटी मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई;...

जळगाव(प्रतिनिधी : सरिता महाजन):दि. 17 जुलै : जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे आज (17 जुलै) "झिरो फेटॅलिटी" मोहिमेअंतर्गत विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या...

सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे १ लाखांच्या चोरीचा काही...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान):दि. १७ जुलै : जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या १ लाख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी काही तासांत...

संपादक - रजत शेख

Latest