भुसावळ शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत चोर अटकेत, ६ चोरीच्या दुचाकी जप्त

Spread the love

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून एकूण ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, भुसावळ शहर, जामनेर व अमळनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

२३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ येथील ZTS रोडवरील एमओएच पार्किंग शेडमधून फिर्यादी विजय जगन्नाथ खडके (वय ४५, रा. मोहित नगर, भुसावळ) यांची सुमारे १५ हजार रुपये किंमतीची हिरो मोटोकॉर्प कंपनीची एमएच-१९-ईके-२३५० क्रमांकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

 

तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून विशाल राजेंद्र राठोर (वय ४६, रा. सरदार वल्लभ मार्ग, अमनखेड रोड, गणेश मंदिराजवळ, वॉर्ड क्र. १, भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

 

कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्यासह एकूण ६ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक रुची गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात पोना अब्दुल रज्जाक खान, पोकों सुबोध मोरे, पोकों राहुल बेहेनवाल, पोकों कुणाल सोनवणे व पोकों दीपक पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest