मावळच्या भोरवाडीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या 37 प्रवाशांची NDRF कडून सुखरूप सुटका

Spread the love

मावळ (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत भोरवाडी गावाजवळ एका खासगी बसमधील 37 प्रवासी पुराच्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. भोरवाडी गावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने खासगी बस अडकून पडली. बस पुढे किंवा मागे हलविणे शक्य नसल्याने बसमधील 37 प्रवासी अडचणीत सापडले.


घटनेची माहिती मिळताच NDRF चे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाईफ जॅकेट आणि दोरखंडांच्या साहाय्याने जवानांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढत एका रांगेत सुरक्षित स्थळी पोहोचविले. संपूर्ण बचाव मोहिमेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

 

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

 

NDRF च्या तत्पर आणि नियोजनबद्ध बचावकार्यातून मोठी दुर्घटना टळली असून बसमधील सर्व 37 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest