मावळच्या भोरवाडीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या 37 प्रवाशांची NDRF कडून सुखरूप सुटका

Spread the love

मावळ (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत भोरवाडी गावाजवळ एका खासगी बसमधील 37 प्रवासी पुराच्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. भोरवाडी गावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने खासगी बस अडकून पडली. बस पुढे किंवा मागे हलविणे शक्य नसल्याने बसमधील 37 प्रवासी अडचणीत सापडले.


घटनेची माहिती मिळताच NDRF चे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाईफ जॅकेट आणि दोरखंडांच्या साहाय्याने जवानांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढत एका रांगेत सुरक्षित स्थळी पोहोचविले. संपूर्ण बचाव मोहिमेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

 

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

 

NDRF च्या तत्पर आणि नियोजनबद्ध बचावकार्यातून मोठी दुर्घटना टळली असून बसमधील सर्व 37 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अनैतिक संबंधाच्या संशयातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; एमआयडीसी पोलिसांकडून...

जळगाव (प्रतिनिधी इमरान खान): अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना शिरसोली येथे घडली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, मूळ...

जळगाव शहर वाहतूक शाखेची वाळूमाफियांवर कारवाई; अवैध वाळूसह ३...

जळगाव (प्रतिनिधी: हिरालाल राजपूत): जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने प्रभावी कारवाई केली आहे. तरसोद फाट्यावरील पुलावर विशेष गस्तीदरम्यान अवैध...

३२ हजार ४९० झाडांच्या रक्षणासाठी जळगावकरांचा आवाज!भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना...

जळगाव : (प्रतिनिधी: राजू शेख): भीमाशंकर परिसरातील ३२ हजार ४९० झाडांची वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीसाठी वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निषेध निवेदन...

संपादक - रजत शेख

Latest