पोलीस निरीक्षक पवन देसले यांची तत्परता; हरवलेला ६ वर्षीय चिमुकला अवघ्या दोन तासांत सुखरूप सापडला

Spread the love

चोपडा (प्रतिनिधी): चोपडा शहरातील गणेश कॉलनी परिसरातून खेळता खेळता रस्ता चुकून हरवलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा चोपडा शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोध लावत त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या समन्वित प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

 

बुधवार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता गणेश कॉलनी येथील रहिवासी शोभाबाई कैलास चौधरी यांचा ६ वर्षीय नातू रुद्र संदीप चौधरी हरवल्याची माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत विशेष पथके विविध भागांत रवाना केली.

 

पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत स्थानिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवान हालचालींमुळे अवघ्या दोन तासांत रुद्रचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्याला सुरक्षित ताब्यात घेऊन चोपडा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

 

पोलीस ठाण्यात मुलाची ओळख पटविल्यानंतर त्याची आजी शोभाबाई चौधरी तसेच इतर कुटुंबीयांना बोलावून घेण्यात आले. हरवलेला रुद्र सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

 

या वेगवान आणि संवेदनशील कामगिरीबद्दल चौधरी कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच चोपडा शहर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेमुळे चोपडा पोलिसांच्या तत्परतेचे आणि जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

धरणगावातील घरफोडीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटक, एका विधिसंघर्षग्रस्त...

धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची पालकांना माहिती; संत ज्ञानेश्वर विद्यालयात...

मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील पहिली पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली....

जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक आरोपी...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये...

संपादक - रजत शेख

Latest