मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त, चार संशयित ताब्यात

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ):जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असून या प्रकरणात दोन आरोपींसह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दिनांक २६ जून २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक २७३/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)) च्या तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संशयितांनी सदर गुन्ह्यासह एकूण ३० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटारसायकली विविध रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील **’पे अँड पार्क’**मध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली.

जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असून, या वाहनांबाबत गुजरातमधील उधना (सुरत) तसेच कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest