नेहरू नगरातील बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २३ हजारांचा ऐवज चोरी

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरू नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू नगर येथील रहिवासी गोविंद रामदास पाटील (वय ५७) हे घर बंद करून बाहेर गेले असताना ८ जून रोजी सकाळी ९.३० ते १० जून रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.

चोरी झालेल्या ऐवजात सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (अंदाजे ६० ग्रॅम वजन), ३ हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस शेगडी तसेच ५ हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी यांचा समावेश असून एकूण नुकसान २३ हजार रुपयांचे झाले आहे.

घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर गोविंद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी किरण चौधरी करीत असून, घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest