घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदार जेरबंद; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): मेहरूण तलाव परिसरातील दोन घरांमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी लेकसाईड रेसिडेन्सी, गणेश घाटजवळ राहणाऱ्या सौ. सुधा प्रभुनाथ कावरा (वय ५१) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तसेच समोर राहणाऱ्या तेजल पियुष संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. घरकामासाठी येणारी महिला समताबाई राजपाल धांडेकर हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

 

तपासादरम्यान घरकाम करणारी महिला समताबाई धर्मराज धांडेकर (वय ४१, रा. येणुका नगर, रमेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिने तिचा साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. ग्राम पिपाराई, गंजबसौदा, जि. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी धर्मराज मीना यालाही अटक केली.

 

आरोपींकडून २३.१० ग्रॅम वजनाचा सुमारे ३.०९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस तसेच ९.६४ ग्रॅम वजनाची सुमारे ९१ हजार रुपये किंमतीची सोन्याची कानातली असा एकूण ४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद लांडवंजारी तसेच पोलीस कर्मचारी विशाल कोळी, सुभाष साबळे आणि योगेश घुगे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest