किरकोळ वादाचे भीषण रूप; पतीकडून पत्नीची कोयत्याने हत्या

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : ता नशिराबाद येथील खंडेराव मंदिराजवळील खालची आळी परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदाबाई विकास जाधव (वय ३०) आणि त्यांचे पती विकास जगन जाधव (वय ३५) हे मूळचे केकत निंभोरा (ता. जामनेर) येथील रहिवासी आहेत. मोलमजुरीच्या कामानिमित्त ते गेल्या वर्षभरापासून नशिराबाद येथे वास्तव्यास होते.

सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. वाद वाढत गेल्याने संतापाच्या भरात विकास जाधव याने घरात असलेल्या कोयत्याने पत्नीवर वार केले. चेहरा आणि मांडीवर गंभीर जखमा झाल्याने मंदाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या दाम्पत्याला सात वर्षांचा मोहित नावाचा मुलगा असून आईच्या निधनामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आरोपी विकास जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मंदाबाई जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पाठविण्यात आला आहे. या हत्येमागील नेमके कारण काय होते, तसेच कौटुंबिक वादाव्यतिरिक्त अन्य काही कारण होते का, याचा तपास नशिराबाद पोलीस सर्व बाजूंनी करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest