गुजरातमधून चोरीस गेलेली ९ लाखांची किया कॅरेन्स कार एमआयडीसी पोलिसांनी केली जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील बोपल पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किंमतीची किया कंपनीची कॅरेन्स (क्र. MP 04 ZL 5155) ही कार एमआयडीसी पोलिसांनी तत्परता दाखवत जप्त केली. या कारसह चालकालाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

बोपल पोलीस स्टेशनमध्ये १५ एप्रिल २०२६ रोजी संबंधित कार चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १८ जून रोजी सायंकाळी ही चोरीची कार नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती बोपल पोलिसांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिली.

या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेतील पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे आणि पोकॉ अफजल बागवान यांनी काशीनाथ चौक परिसरात नाकाबंदी केली. सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता संशयित वाहन तेथे येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने अजिंठा चौफुलीकडे पळ काढला.

यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर वाहन अडविले. चौकशीत सदर वाहन गुजरातमधील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. त्यानंतर वाहन व चालकास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

घटनेची माहिती बोपल पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानुसार १९ जून रोजी गुजरात पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी जळगाव येथे दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेली कार आणि चालक यांना बोपल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे आणि पोकॉ अफजल बागवान यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest