श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सहजयोग ध्यान कार्यक्रम

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेल्थ समितीच्या पुढाकारातून सहजयोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक आरोग्याचा विकास साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहजयोग ध्यानाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयुक्तता तसेच एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. युवाशक्ती संस्थेच्या ऐश्वर्या पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तसेच सहज योग समिती, जळगावचे समन्वयक दीपक सुरेश संगीत यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे प्रात्यक्षिक देत त्याचे फायदे समजावून सांगितले.

या उपक्रमासाठी हेल्थ अँड वेल्थ समितीच्या सदस्या उज्ज्वला नन्नवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ध्यानाचा अनुभव घेतला.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून मानसिक स्वास्थ्य, योग आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत जनजागृती होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

वाढवणा हद्दीत ५.८७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकास अटक

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

संपादक - रजत शेख

Latest