संत ज्ञानेश्वर विद्यालयात योग व संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: सरिता महाजन) रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, दिल्ली यांच्या वतीने मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग व संतुलित आहार विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. निशिगंधा नेमाडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना संतुलित आहाराचे महत्त्व, पौष्टिक अन्नाचे सेवन, तसेच निरोगी जीवनशैलीचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. कार्तिकेय अट्रावलकर यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले. योगामुळे एकाग्रता, तंदुरुस्ती आणि मानसिक संतुलन कसे वाढते याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शनाचा लाभ घेत उपस्थितांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, योग आणि योग्य आहाराविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, १५ शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सुमारे ३०० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

नागरिकांच्या दारी पोलीस; समस्या निराकरणासाठी लातूर पोलिसांचा अभिनव उपक्रम

लातूर, दि. १६ (प्रतिनिधी) : नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक सशक्त करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या त्यांच्या परिसरातच ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने...

चाळीसगावात मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी जेरबंद, दोन...

चाळीसगाव( प्रतिनिधी ): चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून...

दिवसा ढवळ्या जबरी चोरी प्रकरण उघड; पाचोरा पोलिसांची तात्काळ...

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील लक्ष्मी आंगण कॉलनी परिसरात दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात छडा लावत तीन आरोपींना...

संपादक - रजत शेख

Latest