आळंदीत चैन स्नॅचिंगचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद, १२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

आळंदी(प्रतिनिधी):दि. १४ जून : आळंदी परिसरात भरदिवसा घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा तब्बल १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जून रोजी एका नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस शिपाई अमर कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत सापळा रचला आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैष्णव शरद कदम (२०), सचिन जालिंदर कदम (४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (३३), सर्व रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे यांचा समावेश आहे.

पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली ३३.८१० ग्रॅम वजनाची सुमारे ४.९५ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेली ८ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १२.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपासासाठी आरोपींना आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना जेरबंद केल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’; विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे ‘स्वच्छ हात, निरोगी जीवन’...

जळगावात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या दुचाकी जप्त,...

जळगाव(प्रतिनिधी): दि. २२ : शहरातील बालाजी पेठ परिसरातून चोरीस गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या तपासात शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला एरंडोल बसस्थानकावरून ताब्यात...

स्वसंरक्षणासोबत डिजिटल सुरक्षाही महत्त्वाची; ८५० विद्यार्थिनींना पोलीस अधीक्षक अमोल...

लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे...

संपादक - रजत शेख

Latest