गांधी चौक पोलिसांची मोठी कामगिरी : हरवलेले 10 मोबाईल शोधून मालकांना केले परत

Spread the love

लातूर(प्रतिनिधी ):दि. 8 जून : नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे. पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने एकूण 10 हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात दिले.

गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन आदी परिसरातून मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली.

गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकातील पोलीस अंमलदार योगेश चिचोलीकर यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाईल शोधून काढले.

या कारवाईदरम्यान सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल संबंधित मालकांना परत करण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पोलिसांच्या तत्परतेचे, जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सज्ज; शाळा पूर्वतयारी...

जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा...

एकही बालक राहू नये शाळेबाहेर’; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची...

मेहरूण(प्रतिनिधी) : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या एकाही बालकाला वंचित ठेवायचे नाही, या निर्धाराने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण यांनी शाळाबाह्य,...

सावखेडा वाळू ठेका व अवैध डिझेल साठा प्रकरणात मोठी...

अमळनेर(प्रतिनिधी ): तालुक्यातील सावखेडा येथील वाळू ठेका आणि अवैध डिझेल साठा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात...

संपादक - रजत शेख

Latest