लातूर पोलिसांची धाडसी कारवाई; गावठी पिस्तूलासह आरोपी ताब्यात

Spread the love

लातूर(प्रतिनिधी ): सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध शस्त्र व्यवहाराचा प्रयत्न उधळून लावला. २७ मे २०२६ रोजी नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी गोविंद रंगनाथ डुरे (रा. टाकळी, ता. जि. लातूर) याला गावठी पिस्तूलासह ताब्यात घेतले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९१/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी सिद्धू माने (रा. आर्वी, ता. जि. लातूर) व विकास हिंगे (रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वात पार पडली.

कारवाईत पोउपनि श्रीकांत मोरे, पोलीस अमलदार बळवंत भोसले, राजाभाऊ म्हस्के आणि सचिन गिरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक...

जळगाव : (प्रतिनिधी): फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने...

धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,...

संपादक - रजत शेख

Latest