चाळीसगाव तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे गावातील १८ वर्षीय युवकाचा विषारी औषध प्राशन केल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उपचार सुरू असताना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत युवकाचे नाव रविंद्र जालम गायकवाड (वय १८, रा. भिलाटी, तरवाडे, ता. चाळीसगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र हा शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या शेत परिसरात गेला होता. त्यावेळी त्याने काही विषारी औषध सेवन केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २२ मे २०२६ रोजी त्याला धुळे येथे दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार सुरू असताना २५ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तरवाडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, धुळे येथून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण

जळगाव(प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात...

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान...

मेहरुण (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६...

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : ७० लाखांचे एमडी...

ठाणे(प्रतिनिधी) : ठाणे गुन्हे शाखा घटक-१ ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ७० लाख रुपये किमतीचे ५००.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर आणि...

संपादक - रजत शेख

Latest