भुसावळ : लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या खासगी पंटरला लाचखोरी प्रकरणात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव राजू सांगळे असे असून, खासगी पंटरचे नाव सलीम हकीम कुरेशी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराविरोधातील गुन्ह्यात अटक न करता केवळ प्रतिबंधक कारवाई (चॅप्टर केस) करून सोडून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवार (२९ मे) सायंकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सांगळे यांनी त्यांचा खासगी पंटर सलीम कुरेशी याच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधत तडजोड केली आणि लाचेची रक्कम २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. ठरल्याप्रमाणे सलीम कुरेशी याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने सलीम कुरेशी याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान सलीम कुरेशी याने ही रक्कम पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांच्या सांगण्यावरून मागितल्याची कबुली दिली. त्यानंतर एसीबीने तात्काळ कारवाई करत राजू सांगळे यांनाही अटक केली.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीच्या या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक...

जळगाव : (प्रतिनिधी): फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने...

धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,...

संपादक - रजत शेख

Latest