गेवराई पोलिसांची मोठी कारवाई स्विफ्ट कारसह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी गजाआड

Spread the love

गेवराई (प्रतिनिधी: मोसिम शेख) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत स्विफ्ट कारसह एकूण ६ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी विशेष पथकाची स्थापना करून तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गेवराई शहर परिसरात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून स्विफ्ट कार अडवून तपासणी केली असता वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनासह दारू जप्त केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

या कारवाईत स्विफ्ट कार, अवैध दारूचा साठा असा एकूण ६,०८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची मध्यप्रदेशात संयुक्त धडक...

जळगाव : (प्रतिनिधी): फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाने...

धुळे जिल्ह्यातील घरफोडी प्रकरण उघड; फरार दोन आरोपींना रामानंद...

जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान): धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जळगावच्या रामानंद नगर पोलिसांनी शिताफीने अटक करून मोठी कामगिरी बजावली...

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,...

संपादक - रजत शेख

Latest